बांधकाम व सुतारकाम कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या हुन्नर गुरुकुल येथील प्रशिक्षणार्थी मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

स्वतः मधिल कला कौशल्य विकासासोबत व्यसनमुक्त जीवनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे उदाहरणासह रामचंद्र वाघमारे यांनी सांगितले. समवयस्कांच्या दबावाखाली येऊन व्यसनाचा आधार न घेता स्वयं विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. टाइमपास म्हणून सुरू झालेली सवय व्यसनामध्ये परिवर्तित होऊ शकते. वाईट गोष्टींच्या व्यसना ऐवजी चांगल्या गोष्टींची व्यसन लागायला हव.
यावेळी नऊ मुलांनी व्यसन ट्राय केल्याचं मान्य करून स्वतःला व्यसनमुक्त बनविण्यासाठीची तयारी दर्शवली. जनजागृती सत्रानंतर या युवकांना रामचंद्र वाघमारे यांनी समुपदेशन केले. समुपदेशन घेतलेल्या मुलांनी आपल्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाला सुरुवात केली.

Donec sollicitudin molestie malesuada. Nulla quis lorem ut libero.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *