युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सोलापूर, दि. १३ जुलै : सारथी युथ फाउंडेशनतर्फे युवकांसाठी दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा मंथन’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि.१३ जुलै २०२६) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सारथी युथ फाऊंडेशन सोलापूरच्या विडी घरकुल रस्त्यावरील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर तसेच समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. ब्रह्मानंद धडके यांनी उपस्थितांना विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. तथाकथित चमत्कार हे दैवी शक्तीचे नसून केवळ हातचलाखी आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असतात, हे त्यांनी प्रभावी प्रयोगांद्वारे स्पष्ट केले. तसेच समाजातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज अधोरेखित करत दोघांनीही उपस्थित युवकांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन कांचन सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश हसरभावे व कांचन सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.रामचंद्र वाघमारे आणि कोर कमिटी सदस्य प्रसाद अतनुरकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी अंधश्रद्धाविरोधी जनजागृती आणि वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Posts

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीच्या उद्देशाने कॅन्सर हॉस्पिटल भेट, मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप आणि शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सारथी युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.…

Continue reading
सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

सारथी युथ फाउंडेशन सोलापूर ही संस्था तंबाखू व्यसनमुक्ती साठी सतत धडपडत आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये, वस्ती पातळीवर सत्रे घेणे, प्रदर्शने लावणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आदीचे आयोजन करून…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम