संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि सारथी युथ फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

निमित्त होते महाराष्ट्रातील तमाम जनतेला तर्कशुद्ध विचार आणि स्वच्छतेचे धडे देणाऱ्या संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे. त्यासाठी आपदा मित्र- सखी आणि सारथी युथ फाउंडेशन सोलापूरचे स्वयंसेवक श्रीसिद्धेश्वर मंदिराच्या समोरील मोकळ्या पटांगणाची, पार्किंगची स्वच्छता करत असताना दिसून आले. बोट चालविण्याचा सराव ज्याठिकाणी होतो तो परिसर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे या भुमिकेतुन आपदा मित्र-सखी टीमने तलावाच्या पाण्यातील प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कागदी कप, वाळलेली झाडाची पाने, नारळ, निर्माल्य तसेच इतर कचरा अशा अनेक प्रकारचा कचरा रबर बोटीच्या सहाय्याने काढला. बोटिच्या सहाय्याने सिद्धेश्वर तलाव साफ करण्याचा प्रयत्न केला. सिध्देश्वर मंदिर समितीने सदर कार्यास सहकार्य केले.

सदर उपक्रमाचे मंदिरास भेट देणाऱ्या भक्तांनी कौतुक केले. मंदिर परिसरात वारंवार अशी स्वच्छता करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले मार्गदर्शनाखाली सदर मोहीम घेण्यात आली. याप्रसंगी सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे, कोअर कमिटी सदस्य प्रसाद अतनुरकर, शहाजी ढोले, बजरंग होटकर, गुरुनाथ ताटे, सागर धप्पाधुळेसह आपदा मित्र -सखी, सारथी युथ फाऊंडेशन स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदविला.

Related Posts

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सोलापूर, दि. १३ जुलै : सारथी युथ फाउंडेशनतर्फे युवकांसाठी दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा मंथन’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि.१३ जुलै २०२६) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सारथी युथ फाऊंडेशन…

Continue reading
सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीच्या उद्देशाने कॅन्सर हॉस्पिटल भेट, मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप आणि शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सारथी युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम