साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने साकव फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इ. ल. तांडा आणि साईबाबा प्रशाला येथे एकूण २६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्यांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इ. ल. तांडा येथे साकव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील व राहुल बिराजदार यांच्या हस्ते इयत्ता पहिली ते सातवीच्या १५० विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी वाचक दूत श्रीधर खेडगीकर यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने गोष्टींची पुस्तके भेट दिली.

यावेळी शिक्षकवृंद, खेडगीकर, सय्यद, राठोड व कडगी उपस्थित होते. त्यानंतर साईबाबा प्रशाला येथे माळवदे, डॉ. जगदीश पाटील आणि राहुल बिराजदार यांच्या हस्ते ११० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तिपण्णा कोळी, पाटील, थोरात व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Posts

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीच्या उद्देशाने कॅन्सर हॉस्पिटल भेट, मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप आणि शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सारथी युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.…

Continue reading
जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

सारथी युथ फाउंडेशन ही संस्था नावाप्रमाणेच युवक युवतींसाठी त्यांच्या कौशल्य विकासासाठी सतत कार्यरत असते. त्याचप्रमाणे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट हे तंबाखू व्यसनमुक्ती असे आहे. यावर्षीही सारथी युथ फाउंडेशनने युवकांमधील कौशल्यांचा विकास…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम