सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

सारथी युथ फाउंडेशन सोलापूर ही संस्था तंबाखू व्यसनमुक्ती साठी सतत धडपडत आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये, वस्ती पातळीवर सत्रे घेणे, प्रदर्शने लावणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आदीचे आयोजन करून तंबाखू व्यसनमुक्तीचा प्रसार सुमारे पंधरा वर्षांपासून करत आहे.

याचाच एक भाग म्हणून दिनांक 4 फेब्रुवारी 2026 या जागतिक कॅन्सर दिना पासून संस्थेने आपल्या कौशल्य विकास प्रशिक्षण ( ट्रेनिंग) सेंटर विनायक नगर येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी मौखिक तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. आतापर्यंत चार शिबिरे पूर्ण झाली आहेत. या शिबिरात डॉ. शिवकुमार वामने हे आपली सेवा देत आहेत. या शिबिरांचा विडी घरकुल वसाहतीतील रहिवाशांना फायदा होत आहे. संस्थेचे कार्य पूर्णपणे देणग्यावर अवलंबून असल्याने संस्थेने आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यासाठी समाजातील दानशुरांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

त्याप्रमाणे यास प्रतिसाद मिळून ईनर व्हील क्लब सोलापूरच्या पदाधिकारी श्रीमती भारती पाटील, श्रीमती दीपा देसाई, आणि डॉक्टर चेतना मेनन यांनी या शिबिरास दि. 18 मार्च रोजी भेट घेऊन संस्थेच्या गरजेप्रमाणे अनेक वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यांची मदत संस्थेला केली. “या दोन्ही संस्था मिळून जर काम करू लागल्या तर याचा फायदा सोलापूरच्या रहिवाशांना नक्की होऊ शकेल” असे मत इनरव्हील क्लबच्या प्रोजेक्ट पदाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले., व काम चालूच ठेवण्याचे आवाहन केले.सारथी युथ फाऊंडेशनच्या वतीने सचिव श्री. रामचंद्र वाघमारे यांनी ही मदत स्वीकारली तर कोर कमिटी सदस्य श्री. प्रसाद अतनूरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी अनेक रुग्ण, स्वयंसेवक, तसेच अनेक कार्यकर्ते व डॉ. वामने उपस्थित होते.

Related Posts

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सोलापूर, दि. १३ जुलै : सारथी युथ फाउंडेशनतर्फे युवकांसाठी दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा मंथन’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि.१३ जुलै २०२६) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सारथी युथ फाऊंडेशन…

Continue reading
सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीच्या उद्देशाने कॅन्सर हॉस्पिटल भेट, मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप आणि शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सारथी युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम