सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीच्या उद्देशाने कॅन्सर हॉस्पिटल भेट, मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप आणि शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सारथी युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.

समाजातील वाढत्या कॅन्सर रुग्णांची संख्या पाहतात जनजागृतीची गरज लक्षात येते. सोलापूर शहरामध्ये युवकांमधील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाचे वाढते प्रमाण पाहता कॅन्सर जनजागृती अधिक होणे अत्यावश्यक बनले आहे. कॅन्सर आजाराची जनजागृती वाढल्यास व्यसनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते यासाठी सारथी युथ फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सारथी युथ फाऊंडेशन २०१३ पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. कॅन्सर दिनाच्या निमित्ताने मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप याचे उद्घाटन कॅन्सर मुक्त झालेल्या सौ. निलावती डोळस यांच्या हस्ते करण्यात आले. सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र विनायक नगर येथे सदर शिबिर आयोजित करण्यात येईल अशी माहिती‌ सारथी युथ फाऊंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी दिली.

Related Posts

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सोलापूर, दि. १३ जुलै : सारथी युथ फाउंडेशनतर्फे युवकांसाठी दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा मंथन’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि.१३ जुलै २०२६) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सारथी युथ फाऊंडेशन…

Continue reading
साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने साकव फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इ. ल. तांडा आणि साईबाबा प्रशाला येथे एकूण २६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्यांचे वाटप करण्यात आले.…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

युवा मंथनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

साकव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमीत्त सारथी युथ फाऊंडेशन तर्फे युवा शिबिर संपन्न..!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

सारथीच्या आरोग्य शिबीर प्रकल्पाला इनरव्हील क्लबची भरीव मदत!

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र- सखीनी राबविली स्वच्छता मोहीम